आमदार देरकरांच्या पाठपुराव्याने कुटुंबाला मिळाली आर्थिक मदत
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव : तालुक्यातील लहान पांढरकवडा येथील अनिल रमेश फरताडे (वय ३५) या युवकाचा ६ ऑगस्ट रोजी विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेनंतर मृताच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा यासाठी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर यांनी पुढाकार घेतला.
आमदार देरकर यांनी तातडीने प्रशासनाकडून पंचनामा करून घेत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला. अवघ्या दहा दिवसांत शासनाकडून फरताडे कुटुंबाला चार लाख रुपयांची मदत मंजूर करून दिली. त्यामुळे पीडित कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.

यावेळी मदत रक्कम सुपूर्द करण्यात आली असता मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी भीमराव व्हणखंडे, नगराध्यक्ष मनीष मस्की, शिवसेना तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, शहरप्रमुख अभय चौधरी, करण किंगरे , मारोती गौरकार, सौ. अरुणाताई खंडाळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.
शासनाच्या या मदतीमुळे फरताडे कुटुंबावर आलेले संकट काही प्रमाणात हलके झाले असून ग्रामस्थांनी आमदार देरकर यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.


