ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी शहरापासून तर गाव खेड्या पर्यंतच्या वंचित, शोषित समाजाला जागविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.नीरज वाघमारे यांनी सुरू केलेल्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद यात्रेला संपूर्ण जिल्हाभर प्रचंड प्रतिसाद मिळत असून, दुर्गम व आदिवासी बहुल असलेल्या झरी तालुक्यात झालेला संवाद दौरा खऱ्या अर्थाने झंजावाती दौरा ठरला आहे.
महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेलगत असलेल्या झरी या दुर्गम व आदिवासी तालुक्याचा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांनी नुकताच १४ ऑगस्ट रोजी कार्यकर्ता व पदाधिकारी संवाद दौरा केला. यावेळी त्यांनी झरी तालुक्यातील जामणी, सतपल्ली,पाटण, जुनोनी, अडेगाव, राजुर, मांगली इत्यादी गावांना भेटी देत त्यांच्याशी संवाद साधला.

नियोजित संवाद दौऱ्याची वेळी दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय शोषणाविरुद्ध वंचित बहुजन आघाडीने दंड थोपटले असून मागासवर्गीयांना सत्तेत प्रतिनिधित्व मिळण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढत आहे. प्रस्थापित मनुवादी पक्षांनी आजपर्यंत अल्पसंख्यांकांना सत्तेत साधा प्रवेशही करू दिला नाही. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी छोट्या-छोट्या समाज समूहाला सत्तेत वाटा मिळावा म्हणून सर्व जाती समूहाचा विचार केलेला आहे.
आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी उभे राहून सत्ता संपादन करावी, असे विचार डॉ.नीरज वाघमारे यांनी व्यक्त केले.
आयोजित संवाद दौऱ्याचे वेळी गावागावात मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले असून, गावोगावी झालेल्या गावभेटी मध्ये झालेल्या सभांमधून, वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे स्पष्ट चित्र दिसत होते.
याप्रसंगी मिलिंद पाटील-जिल्हा महासचिव, राजेंद्र निमसटकर, राजु कांबळे, प्रियल पथाडे, गौतम हस्ते, राजबा धोटे, महादेव धोटे, गगन ड्यागर्लावार, अशोक बट्टावार, अनुप भांदककर, शरद पळवेकर, सुखदेव वाघमारे, नवनाथ देवतळे, भूषण काटकर, गंगाधर बनकर, राजीव करमणकर, निकेश कांबळे, राजू धोटे, गौतम मून, उत्तम मून, गौतम बाराहाते, सुधाकर नरांजे, हेमराज नगराळे, अमर रामटेके, ओमप्रकाश तेलंग, इत्यादी पदाधिकारी हजर होते.


