विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क यवतमाळ
यवतमाळ : जागतिक परिचारिका दिनानिमित्त परिचारिकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार दिला जातो. त्यानुसार यावर्षी जिल्ह्यातून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या परिचारिकेची द्वितीय क्रमांकाने निवड होऊन त्यांना फ्लॉरेन्स नाईटिंगेल द्वितीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जयश्री महादेव इंगोले, कवाडे यांच्या हा सत्कार समारंभ दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हा परिषद सभागृह, यवतमाळ येथे पार पडला. या प्रसंगी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) साहेब यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र व नगद रक्कम असे आहे.
आरोग्य सेवेत केलेल्या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा मानाचा सन्मान देण्यात आला.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले असून, सहकारी व नागरिकांमधूनही आनंद व्यक्त करण्यात येत आहे.


