ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या नेतृत्वाखाली वृक्षारोपण
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव: पर्यावरण संवर्धनाचा संकल्प ठेवत मारेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी, बुधवार सकाळी 10:30 वाजता भव्य वृक्षारोपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

हा उपक्रम ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस कर्मचारी उत्स्फूर्तपणे उपस्थित राहून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी जोपासण्याचा संकल्प त्यांनी केला.

स्थानिक पोलीस प्रशासनाकडून आयोजित हा उपक्रम समाजातील नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून, भविष्यात हिरवेगार आणि स्वच्छ पर्यावरण घडविण्यासाठी ही पावले महत्त्वपूर्ण ठरतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली.
“स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त मारेगाव घडविण्यासाठी पोलीस दल सदैव तत्पर आहे,” असे ठाणेदार उमेश बेसरकर यांनी यावेळी सांगितले.


