कर्तव्यावर शहीद ठाणेदाराला पोलिस दलाची अश्रुपूर्ण श्रद्धांजली

0
1229

वणी येथील SDPO कार्यालयात ठाणेदाराला अखेरची सलामी

सुरेश पाचभाई मारेगाव

वणी :कर्तव्यनिष्ठ, जनतेशी आपुलकीनं वागणारे आणि सहकाऱ्यांचे खरा मार्गदर्शक ठरलेले मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण यवतमाळ पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवार, दि. 23 फेब्रुवारी 2025 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वणी येथील SDPO कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली सभेत वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ कर्मचारी, सहकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शिस्तबद्ध तुकडीने दिलेली अखेरची सलामी आणि बिगुलाचे स्वर दुमदुमताच वातावरण भावनिक झाले.

आपल्या सेवाकाळात ठाणेदार बेसरकर यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल करून जनतेचा विश्वास जिंकला होता. नागरिकांशी मानवी नातं जपत, सहकाऱ्यांशी आपुलकीनं वागणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा होती. “ते फक्त अधिकारी नव्हते, तर आमचे मार्गदर्शक होते,” अशा शब्दांत सहकाऱ्यांनी त्यांना आठवले.

केवळ दोन दिवसांपूर्वीच त्यांनी मारेगाव पोलीस स्टेशनच्या परिसरात 200 वृक्षांचे वृक्षारोपण करून समाजासाठी हिरवाईची शेवटची आठवण सोडली होती. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणे अशक्य असल्याचे मत या सभेत व्यक्त झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here