सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव:तालुक्यातील शिवणी धोबे गावात पारंपरिक तानापोळ्याचा जल्लोष अनुभवायला मिळाला. दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी गावकऱ्यांच्या उपस्थितीत पारंपरिक रितीरिवाजानुसार तानापोळा उत्साहात पार पडला.
गावातील लहानग्यांनी रंगीबेरंगी व पारंपरिक पोशाख परिधान करून सजवलेल्या बैलांच्या प्रतिकृतींसह मिरवणुकीत सहभाग घेतला. मुलांचा आनंद, आकर्षक पोशाख, व बैलांच्या सजावटीमुळे परिसर उत्साहाने निनादला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच निलेश राशेकर, पोलीस पाटी पद्माकर पा. धाबेकर, माजी सरपंच अशोक पा. धोबे, मधुकर पाटील धोबे, मारोती धोबे महाजन, रमेश ढोके व जगदीश पा. काटवले आदी मान्यवर व गावातील नागरिक उपस्थित होते.
गावकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तानापोळ्याची परंपरा अधिक बळकट झाली. परंपरेसोबतच सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारा हा सोहळा गावाच्या सांस्कृतिक जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला.


