भरधाव ट्रकची दुचाकीला भीषण धडक – तरुणाचा जागीच मृत्यू

0
2804

बुरांडा (हेटी)येथील राज्य महामार्गावरील घटना

सुरेश पाचभाई मारेगाव 

मारेगाव तालुक्यातील बुरांडा हेटी येथे आज रविवार,दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात मुकेश ज्ञानेश्वर आडे (वय 27, रा. बुरांडा हेटी) यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश आडे हे करंजी येथून आपले काम आटोपून दुचाकीवरून गावी परतत होते. गावाजवळील राज्य महामार्गावर एका भरधाव अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

या अपघातामुळे आडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, पत्नी व केवळ चार महिन्यांचा लहान मुलगा असा आप्त परिवार आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, अपघातानंतर अज्ञात ट्रकचालक पसार झाला असून मारेगाव पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम हाती घेतली आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

👉 अपघातस्थळी लोकांची मोठी गर्दी – संताप व्यक्त

👉 गावात हळहळ – सर्वत्र शोककळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here