सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव पोलीस ठाण्यात आज एक वेगळाच भावनिक क्षण अनुभवायला मिळाला. ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या स्मृतीस पोलीस कर्मचाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण करून आपल्या भावनांना अभिव्यक्त केले.
आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोज सोमवारला दुपारी 12.30 वाजता पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला पोलीस कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सहकाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तर चेहऱ्यावर उमेश बेसरकरांप्रती अपार आदर दिसून येत होता.

कार्यक्रमादरम्यान त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी “कर्तव्यदक्ष व जनतेच्या हितासाठी नेहमी तत्पर असलेले अधिकारी” अशी आठवण सर्वांच्या तोंडी होती.
हा श्रद्धांजली कार्यक्रम साधा असला तरीही त्यात दडलेला सहकाऱ्यांचा भावनिक ओलावा मारेगाववासीयांच्या मनात कायम राहील, अशी भावना व्यक्त करण्यात आली. श्रद्धांजली कार्यक्रम मध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सुळे,विकी जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल रजनीकांत पाटील व इतर कर्मचारी आणि होमगार्ड सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


