सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगांव पोलिस ठाण्याचे ठाणेदार उमेश खुशालराव बेसरकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे. त्यांच्या निधनानंतर मारेगांव पोलिस ठाण्याचे ठाणेदारपद रिक्त झाल्याने, पोलीस नियंत्रण कक्ष, यवतमाळ येथे कार्यरत असलेले अधिकारी श्याम भरत वानखेड यांची मारेगांव पोलिस ठाण्याचे नवे ठाणेदार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आजपासून वानखेड यांनी मारेगांव पोलिस ठाण्याचे सूत्र हाती घेतले असून कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मारेगांव परिसरात यापूर्वी दिवंगत ठाणेदार उमेश बेसरकर यांनी उत्कृष्ट कार्य केले होते. त्यांच्या कार्याची आठवण नागरिकांच्या मनात कायम राहील. तर नवे ठाणेदार श्याम वानखेड यांच्या नेतृत्वाखाली पोलिस यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा आहे.



