सोयाबीन पिकांवर चारकोल रॉटचा धोका!

0
440

शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे तातडीची खबरदारी

महत्वाच्या वाढीच्या टप्प्यावर रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता – शेतकऱ्यांनी सतर्क राहावे

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला तर्फे वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांमध्ये चारकोल रॉट (मुळकुज व खोडकुज) रोग आढळल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. सध्या  पिकं शेंगा लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत, ज्यामुळे रोगाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.

रोगाची सुरुवातीची लक्षणे म्हणजे पाने जमिनीकडे झुकणे, पिवळी पडणे आणि मुळाची साल सहज निघणे. रोग प्रगतीशील अवस्थेत झाड पूर्णपणे वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी दिसते, ज्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होते.

रोग नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ उपाय करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगण्यात आले आहे:पिकावर अधूनमधून पडणारा पाऊस रोगाची तीव्रता कमी करण्यात मदत करतो.पिकाला पाणी लागल्यास संरक्षित ओलीत करावी, कारण कोरडी जमीन असल्यास मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाहीत.

ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशकाचा वापर करावा – २ किलो ट्रायकोडर्मा २५–३० किलो शेणखतात मिसळून पिकाच्या पॅचेसमध्ये फेकावे.थायोफनेट मिथाईल ७०% (Thiophanate methyl 70% WP) या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी, ज्यामुळे रोगाची तीव्रता कमी करता येईल.

रोग नियंत्रण न केल्यास सोयाबीन पिकांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे योग्य वेळी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here