दिल्लीतील परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्थेकडून सन्मान
सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांना प्रतिष्ठेचा “बेस्ट प्रिन्सिपल अवॉर्ड” जाहीर झाला आहे. दिल्ली येथील परमहंस शैक्षणिक व संशोधन संस्था दरवर्षी शिक्षणक्षेत्रातील नामवंत व्यक्तींना विविध पुरस्कारांनी गौरविते. यंदा या संस्थेकडून प्राचार्य डॉ. घरडे यांना हा मानाचा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ घडवून आणणे, व्यावसायिकता, संशोधनातील नवकल्पना आणि महाविद्यालयीन व्यवस्थापनात केलेले उत्तम कार्य या निकषांच्या आधारे डॉ. घरडे यांची निवड करण्यात आली.

डॉ. घरडे यांना हा पुरस्कार मिळाल्याची बातमी कळताच शेतकरी शिक्षण संस्था, मारेगाव, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासह मित्रपरिवाराकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक कार्यात नाविन्यपूर्ण पद्धती वापरत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नेहमी तत्पर असलेल्या डॉ. घरडे यांच्या यशामुळे मारेगावच्या शैक्षणिक वर्तुळात अभिमानाची भावना व्यक्त केली जात आहे.
✨ मारेगावच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी हा सन्मान नक्कीच ऐतिहासिक ठरणार आहे.


