पस्तीस वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र एकत्र

0
2596

सुरेश पाच भाई मारेगाव


मारेगाव शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा देत मारेगाव येथील महात्मा फुले विद्यालयात १९९० सालच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून तब्बल पस्तीस वर्षांनंतर वर्गमित्र एकत्र आले आणि जुन्या मैत्रीचे सोनेरी क्षण पुन्हा अनुभवले.

या मेळाव्याचे आयोजन संपर्कात असलेल्या काही मित्रांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी तत्कालीन वर्गशिक्षक अनुभव पाझारे सर, वाघमारे सर, धोटे सर आणि राजूरकर सर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिला. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक ताजने सर यांचेही सहकार्य लाभले.

दारव्हा, घाटंजी, यवतमाळ, नागपूर, भद्रावतीसह विविध ठिकाणांहून माजी विद्यार्थी हजेरी लावली. काळाच्या ओघात अनेक बदल झाले तरी मैत्रीचे बंध आजही घट्ट असल्याचे या स्नेहमेळाव्यातून प्रकर्षाने जाणवले.

या प्रसंगी साईनाथ बल्की, विलास पोटे, मिलिंद चिकाटे, योगेश देठे, संजय विरुटकर, धनराज नागपुरे, प्रकाश चव्हाण, कल्पना पारखी, सपना वारारकर, धनराज मेश्राम, ज्ञानेश्वर ढवस, अनिल वांढरे, देवराव बोथले, बंडू वनकर, शैलेन्द्र तेलंग, राजू भरणे, केशव बदखल, भूपेश उपलंचिवार, बाबाराव उडाखे, दिवाकर गेडाम, विष्णु उईके, शरद खापणे,

गौतम भसारकर, गोपीचंद भसारकर, ज्ञानेश्वर धोबे, विजय जांभुळकर, प्रभाकर किन्हेकर, राजू ठक, गणपत अत्राम, रावभान शेंडे, नंदा कळस्कर, सुनंदा आसुटकर, दुर्गा पायघण, प्रेमिला नागरकर, मंगला बोथले, उषा सुर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते.शिक्षक व मित्रांच्या भेटीने आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here