मारेगाव तालुक्यात पावसाचा कहर!

0
2062

वर्धा नदीला पूर – कोसारा (सोईट) पूल पाण्याखाली; यवतमाळ-चंद्रपूर संपर्क तुटला

सुरेश पाचभाई मारेगांव,

मारेगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला पूर आला आहे. त्यामुळे कोसारा (सोईट) गावाजवळील वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून शुक्रवारी (दि. 12 सप्टेंबर) सायंकाळी 5.30 वाजल्यापासून यवतमाळ-चंद्रपूर जिल्ह्याचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

Rain wreaks havoc in Maregaon taluka!

Wardha river floods – Kosara (SOIT) bridge under water; Yavatmal-Chandrapur communication cut off

सततच्या पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले असून काही शेतजमिनींना तलावाचे स्वरूप आले आहे. हातात आलेली पिके नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मार्डा डॅमवरून पाणी ओसंडून वाहत असून अनेक गावांतील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. घराबाहेर पडण्यासही नागरिकांना अडचणी येत आहेत. शेतमजुरांचे काम बंद पडल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महसूल व पोलिस प्रशासन सतत पाहणी करत असून नागरिकांनी दक्षता घ्यावी, अनावश्यक ठिकाणी फिरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here