सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव (दि. १२ सप्टेंबर २०२५) – कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, मारेगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थी कल्याण मंडळाची निवडणूक उत्साहात पार पडली.
या निवडणुकीत अध्यक्षपदी अनुज नगाजी पावडे यांची व उपाध्यक्षपदी कु. चांदनी जगदीश पानेरी यांची निवड झाली. स्नेहसंमेलन संयोजकपदी विराज नंदकिशोर वासेकर व कु. प्रिती पांडुरंग जांभुरुकर यांची निवड झाली. तसेच क्रीडा सचिवपदीही विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

Maregaon (September 12, 2025) – The election of the Student Welfare Board for the academic year 2025-26 was held with enthusiasm at the Junior College of Arts, Commerce and Science, Maregaon.
निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. कु. सातपुते मॅडम व प्रा. कु. आवारी मॅडम यांनी काटेकोरपणे कार्यभार सांभाळला. प्रा. हेलगे सर यांच्या देखरेखीखाली सर्व नियमांचे पालन करून निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. चौधरी सर यांनी विद्यार्थ्यांना निवडणुकीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिंचोलकर सरांनी केले. या निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने सहकार्य केले.


