पिंटुभाऊ बिळकर यांना मातृशोक
गजानन आसुटकर मारेगाव,
मारेगाव : येथील रहिवासी कुंदाबाई विठ्ठलराव बिळकर (वय ६९) यांचे दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवार पहाटे ५:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.त्या मारेगाव येथील वाडा क्र. ५ येथे वास्तव्यास होत्या.
पहाटेच्या सुमारास अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाने बिळकर परिवारावर शोककळा पसरली आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन विवाहित मुली, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.
🔸अंत्यसंस्कार : आज दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोज मंगळवारला दुपारी २:४५ वाजता मारेगाव येथील स्मशानभूमीत होणार आहेत.


