विद्यार्थ्यांना आला न्यायव्यवस्थेचा थेट अनुभव
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव:पांढरकवडा (ता. केळापूर) – महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता लोक अदालतांचे आयोजन करण्यात आले होते.
पेंडिंग असलेल्या केसेसचा निकाल जलदगतीने करण्याच्या उद्देशाने या लोक अदालतांचे आयोजन करण्यात आले होते.याच अनुषंगाने पांढरकवडा येथील न्यायालयातही असंख्य प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी पांढरकवडा न्यायालयाचे सर्व न्यायाधीश व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी )येथील नूरजहा बेगम सलाम अहमद वुमेन्स कॉलेज ऑफ लॉ कॉलेजचे अध्यक्ष डॉ. राणा नूर सिद्दिकी, प्राचार्य पूजा बनकर तसेच प्रा.शैलेंद्र धोटे, रेश्मा शेख मॅडम, प्रवीण मॅडम, व सर्व विद्यार्थिनी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना न्यायालयीन कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, न्यायपालिकेचे महत्त्व समजावे व त्यांचे मनोबल तसेच ज्ञान वृद्धिंगत व्हावे, या हेतूने विद्यार्थ्यांना लोक अदालतीमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.

या प्रसंगी विद्यार्थिनींनी लोक अदालतातील अनुभव कथन करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. न्यायव्यवस्थेच्या कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष साक्षीदार झाल्याने त्यांना भविष्यातील कायदे शिक्षणात मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाला माननीय न्यायाधीश श्री. ए. एम. देशमुख (जिल्हा, सत्र न्यायाधीश), माननीय श्री. के. के. माने (न्यायाधीश), मान. श्रीमती कसिम (न्यायाधीश), मान. शेख मॅडम (न्यायाधीश) तसेच माननीय डॉ.राणा नुर सिद्धीकी मॅडम उपस्थित होते.


