ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराज अभियान पंधरवडा पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 02 ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागरीकांच्या व शेतक-यांच्या जिव्हाळयाची विविध महसुली कामे मोहिम स्वरूपात पार पाडण्यासाठी सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबत निर्देश शासन स्तरावरून प्राप्त झालेले आहेत.
त्यानुसार झरी जामणी तालुक्यात जनजागृती सुरू करण्यात आली आहे. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पहिला टप्पा पांदण रस्त्याबाबत आज रोजी सुरुवात करण्यात आली.सदरचा अभियान तीन टप्प्यात राबवायचे असुन 17 ते 22 सप्टेंबर या पहील्या टप्प्यात पांदण रस्ते विषयक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये शिव/पांदण/वहीवाटीचे रस्त्यांचे सवेक्षण करणे, ज्या पांदण रस्त्यांची नोंद गाव नकाशात नाही त्याची नोंद घेण्यात येणार आहे.

तसेच शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमती पत्र घेणे, रस्त्यावरील अतिक्रमणे निष्कासित करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन निश्चीत करणे इत्यादी कामे करण्यात येणार आहे. 23 ते 27 सप्टेंबर या दुस-या टप्प्यात सर्वांसाठी घरे या विषयाअंतर्गत रहीवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे नियमानुकुल करणे ही कामे हाती घेतले जाणार आहे.
28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या तिस-या टप्प्यात मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे मार्गदर्शनाखाली विविध नाविण्यपुर्ण उपक्रम महसुल विभागामार्फत राबविले जाणार आहेत. तेव्हा तालुक्यातील नागरिकांनी शेतकऱ्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज अभियान पंधरवड्यामध्ये भाग घ्यावे असे आवाहन तहसीलदार श्री अक्षय रासने यांनी केले आहे.


