सुरेश पाचभाई, मारेगाव
मारेगाव : सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त समाजसेविका आणि नूरजहाँ चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ. राणा नूर सिद्धीकी यांचा वाढदिवस दिनांक १८ सप्टेंबर २०२५ रोजी (गुरुवार) बुरांडा (ता. मारेगाव) येथील नूरजहाँ बेगम सलाम अहेमद वूमेन्स कॉलेज ऑफ लॉमध्ये प्राचार्या पूजा बनकर मॅडम, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती परवीन शेख मॅडम यांनी केले. प्रा. शैलेंद्र धोटे यांनी डॉ. राणा नूर मॅडम यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करीत त्यांच्यावर आधारित कविता सादर केली. ऍड. हुमैरा शरीफ यांनी मनोगत व्यक्त करीत त्यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

यावेळी प्रा. शशिकांत आडे, प्रा. स्मिता उमरे, ऍड. रेश्मा शेख, ऍड. निदा शेख, ऍड. योगेश कोठेकर आणि क्लर्क सैफ यांनीही आपली मते व्यक्त करून डॉ. सिद्धीकी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

कॉलेजच्या विद्यार्थिनींनी बैर्थडे कार्ड व भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. ऋतुजा ठमके हिने आकर्षक रांगोळी काढली तसेच इलेक्ट्रिक पुष्पगुच्छ भेट दिला. वाढदिवस सोहळ्याला इंजि. सुरेश पाचभाई, एजाज शेख, मधुभाऊ वरडकर, नाना सुर्तेकर, शफीक शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

डॉ. राणा नूर सिद्धीकी यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री सक्षमीकरण क्षेत्रात दिलेले योगदान अनुकरणीय असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभावे, अशा शुभेच्छा यावेळी सर्वांनी दिल्या.



