सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील गोधनी येथे दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी मौजा गोधनी येथे ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विभागाअंतर्गत राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया गळीत धान्य अंतर्गत शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी कु.दिपाली खवले यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. त्यांनी शेतकऱ्यांना फळबाग लागवड व PMFME योजनेअंतर्गत उपलब्ध संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री. डोंगरकर यांनी कापूस, सोयाबीन व तूर पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन तसेच महाविस्तार AI ॲप याविषयी माहिती दिली.

माननीय श्री. शामल राऊत यांनी PMFME अंतर्गत शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीचे संधी स्पष्ट केल्या. तर सहाय्यक कृषी अधिकारी श्री. तुषार मेश्राम यांनी खतांचा अतिवापर आणि त्याचे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना जागरूक केले.
या प्रसंगी कृषी सेवक श्री. सनद घुसळकर, श्री. निखिल पवार, श्री. वैभव मेश्राम यांच्यासह गावातील शेतकरी, महिला मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन आत्राम यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


