जळका येथील आनंद बालसदनातून ९ वर्षीय मुलगा बेपत्ता

0
23

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जळका येथील आनंद बालसदनमधून नऊ वर्षीय मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बालसदनचे काळजीवाहक मोहन महादेव उईके यांनी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव रुद्रा आकाश राठोड (रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी, जिल्हा यवतमाळ, सध्या आनंद बालसदन, जळका) असे असून, तो दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता बालसदनात हजर होता. त्यानंतर तो कोणाच्याही निदर्शनास आला नाही.

रुद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे : उंची अंदाजे ३ फूट ५ इंच, रंग सावळा, अंगावर पांढरा शर्ट व निळा पॅन्ट परिधान केलेला. तो मराठी भाषा बोलतो.

सदर मुलगा आढळल्यास तात्काळ मारेगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक किसन सुंकुलवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here