राजे विश्वेश्वरराव कला-वाणिज्य महाविद्यालयात रा.से. यो. स्थापना दिवस साजरा
भामरागड – प्रतिनिधी
भामरागड:जगभरात भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखल्या जात असून याच युवकांच्या माध्यमातुन विकसित आणि गौरवशाली भारताचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यामुळे राष्ट्राच्या प्रगतिकरिता युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन साहित्यिक व स्तंभलेखक डॉ. संतोष डाखरे यांनी व्यक्त केले. येथील राजे विश्वेश्वरराव कला वाणिज्य महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी मंचावर अध्यक्ष म्हणून डॉ. सुरेश डोहने तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. संतोष डाखरे, डॉ. प्रमोद घोनमोडे, डॉ. कैलास निखाडे, प्रा. मोराळे, प्रा. विशाल तावेडे उपस्थित होते.

युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन सेवाकार्यात वाहून घेणे गरजेचे असल्याचे मत डॉ. प्रमोद घोनमोडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातुन गाव पातळीवर भरीव कार्य करण्याची संधी युवकांकडे असल्याचे मत डॉ. कैलास निखाडे यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना ही सामाजिक परीवर्तन घडवून आणण्याचे सशक्त माध्यम असल्याचे मत डॉ. सुरेश डोहने यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मोराळे तर संचालन व आभार प्रदर्शन किरण कुरसामी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सुनील ताजने आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


