ओला दुष्काळ जाहीर करा – शिवसेना ‘उबाठाची’ मागणी

0
187

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा यांच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले.

शिवसेनेच्या किरणताई देरकर व दीपक कोकास यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. जिल्ह्यातील कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट अनुदान द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्यांच्या उंबरठ्यावर पोहोचले असून संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध असून दरवर्षी नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे शेकडो शेतकरी आपले जीवन संपवतात. अशा स्थितीत शासनाने तातडीने पावले उचलून शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा,अशीही मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शिवसेनेच्या किरणताई देरकर, दीपक कोकास, इंदुताई किन्हेकार, डीमन टोंगे, जिजा वरारकर, मधू वरटकर, बदरुद्दीन काजी, देवा बोबडे, तुळशीराम मस्की, अभय चौधरी, करण किंगरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here