सुरेश पाचभाई, मारेगाव,
मारेगाव: तालुक्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुक्याच्या वतीने मार्डी येथील बाजार चौकात २२ सप्टेंबरपासून सुरू झालेले बेमुदत आमरण उपोषण तिसऱ्या दिवशी मागण्यांची दखल घेत संपुष्टात आले.

आज दिनांक २४ सप्टेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास आमदार संजय देरकर, तहसीलदार उत्तम निलावाड, जिल्हा प्रमुख संजय निखाडे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, विधानसभा समनवय सुधीर थेरे, वणी तालुका प्रमुख संतोष कुचणकर, माजी जी.प सदस्य वणी दिलीप काकडे,नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की,

उपजिल्हा संघटिका डीमनताई टोंगे,ठाणेदार श्याम वानखेडे,पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे पांडरकवडा, उपअभियंता मारेगाव श्यामसुंदर कुर्रा, जिल्हा परिषद अभियंता संजय शिंदे,कृषी विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली.

उपोषणादरम्यान तालुक्यातील शेतकऱ्यांचे कर्जमुक्ती, पिकांचे नुकसानभरपाई, विद्युत पुरवठ्यातील अडचणी, ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था तसेच अवैध धंद्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. यासोबतच ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणीही करण्यात आली.

तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, संपर्क प्रमुख सचिन पचारे, उपतालुका प्रमुख विजय अवताडे, माजी उपाध्यक्ष शरद ताजणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपोषणात सहभागी झाले होते.या उपोषणातून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा ठाम आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्यात आला.


