शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अनंत मांडवकर

0
214

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव:बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करणाऱ्या शिव महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी मारेगाव येथील आघाडीचे उद्योजक इंजिनीयर अनंत मांडवकर यांची नुकतीच एकमताने निवड करण्यात आली.

समितीच्या बैठकीत मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपाध्यक्ष प्रा. डॉ. करमसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. यावेळी ज्येष्ठ सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अनंत मांडवकर यांच्या नावावर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.

यापूर्वी समितीचे पहिले अध्यक्ष एड. निलेश चौधरी, दुसरे डॉ. रमेश सपाट तर तिसरे अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी होते. गेल्या चार वर्षांपासून मा. अजाणी यांनी समितीचे अध्यक्षपद यशस्वीरीत्या सांभाळले.

अनंत मांडवकर हे बी.ई. (सिव्हिल) इंजिनीयर असून मारेगाव शहरातील अमन ट्रेडर्स या प्रतिष्ठानचे ते संचालक आहेत. तसेच ते मराठा सेवा संघाच्या अमरावती विभागाचे उपाध्यक्ष असून विविध पुरोगामी आणि परिवर्तनवादी चळवळीत त्यांचे सक्रिय योगदान राहिले आहे.

नवीन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अनंत मांडवकर यांनी आपल्या निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बळीराजा व्याख्यानमाला अधिक यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तर मावळते अध्यक्ष शहाबुद्दीन अजाणी यांनी सर्व सदस्यांचे आभार मानत समितीशी कायम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here