ज्ञानेश्वर आवारी झरी जामणी
झरी जामणी: तालुक्यातील मुकुटबन पासून हाकेच्या अंतरावर खडकी (गणेशपूर ) हे लहान से गाव या गावाला प्राथमिक शाळा होती आणि आता आहे. पण चार वर्षे लहाण्यांची किलबिलाट बंद झाली . शाळेला अवकळा आली .गाव शाळेला पोरख झालं म्हणजे औद्योगिक क्षेत्राच्या परिसरात मुख्यरस्त्याला लागून गावात शाळा नव्हती.
2018 ला या गावची शाळा बंद पडली तेव्हा पासून 2022 पर्यंत शाळेची घंटाच वाजली नाही. या गावातील सावित्रीना हे पाहवल नाही . श्रीमंताची मुलं कुठेही पैसा खर्च करून शिक्षण घेईल . गावातील शाळा बंद राहिली तर कष्टकरी गरीब शेतकरी शेतमजूर यांची मुलं कुठे शिकणार ? आता आपल्या गावातील शाळा सुरु झाली पाहिजे यासाठी सावित्रीरूपी महिलांचे चे प्रयत्न सुरु झाले शेवटी 2022 ला या सावित्रीना यश मिळाले शाळा सुरु करण्याचे आदेश हातात घेऊन शाळेत आले.
परंतु शाळेला गुरुजी नाही आता काय तर दुसऱ्या दिवशी वैरागडे गुरुजी शाळेत प्रतिनियुक्तीने हजर झाले महिलांचा उत्साह वाढला गुरुजींनी प्रभार घेऊन शाळेला जिवंत केले सोबतच पालकांचा विश्वास संपादन करून विद्यार्यंची पटसंख्या वाढवली सर्व मुलांना बोलके करून विद्यार्थ्यांची गुणवत्ता दिवसेंदिवस वाढत होती शाळेच्या जिवंतपणा गुरूंजीनी टिकवून ठेवला शेवटी अशा शाळेला पुनर्जिवीत करणाऱ्या वैरागडे गुरुजीची प्रतिनियुक्ती शासनाने रद्द केली.

सर्व गावकरी नाराज झाले आमच्या मुलांना माया लावणणारे, आमच्या मुलांची काळजी करणारे आमचे गुरुजी आता जाणार या भावनेने भावुक झाले.आम्हांला आमचे गुरुजी वापस द्या यासाठी प्रयत्न सुरु केले परंतु
प्रशासनाने ऐकले नाही त्यामुळं आमच्या गुरुजीचा आम्ही सन्मान करून गुरुजींना निरोप देऊ त्यासाठी सर्व शाळा व्यस्थापन समिती व पालक वर्ग व इतर गावातील पुढारी एकत्र आले आणि गुरुजी चा सन्मान सोहळा व निरोप समारंभ कार्यक्रम घेतला प्रचंड भावुक वातावरनात गुरुजी प्रती असलेल्या भावनांना वाट मोकळी केली.
सर्वांचा गुरुजीना एकच प्रश्न आमच्या मुलांना आता माया कोण लावेल असे म्हणत अनेक महिलांनी आपल्या डोळ्यात अश्रू आणले आता तुम्ही विसरू नका असा भावनिक आक्रोश करत शाळा व्यवस्थापन समितीच्या व ग्रामपंचायतच्या वतीने वैरागडे गुरुजींना भावुक वातावरणात सहपत्नीक सन्मान करुन निरोप दिला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणूंन शाळा व्य समिती अध्यक्ष सौ कोमल ताई आत्राम व प्रम्मुख अतिथी म्हणून सौ शुभांगी लोडे, अमोल आसुटकार, केंद्रप्रमुख श्री उदार सर,जगदीश आरमुरवार सर,
ढोंगळे सर, नेताजी पारखी सर,कल्पना आत्राम, विलास येरकाडे, दिनेश भाऊ आंबटकर, जगन भाऊ लोडे हे होते या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन माजी सरपंच संतोष बरडे तर आभार प्रदर्शन या शाळेत नव्याने रुजू झालेले या शाळेचे मुख्यध्यापक श्री इंगोले सर यांनी केले. हा भावुक सोहळा यशस्वी करण्यासाठी मंगेश टोंगे, जीवन आत्राम, अंकुश येलादे, माधुरी आत्राम शंकर पुसनाके, सुभाष जाधव, कुसुम आडे, सुधीर किनाके यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले .