घोगुलधरा येथे प्रगतिशील शेतकरी कैलास डोंगरकर यांच्या शेतास अभ्यासदौरा

0
422

सुरेश पाचभाई, मारेगाव

मारेगाव तालुक्यातील घोगुलधरा येथील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकरी मा. कैलास डोंगरकर यांच्या शेतावर दिनांक 1 ऑक्टोबर रोजी अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या अभ्यासदौऱ्यास वणीचे उपविभागीय अधिकारी मा. नितीशकुमार हिंगोले, मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारी वणी मा. गज्जलवार, तालुका कृषी अधिकारी कु. दीपाली खवले, मंडळ कृषी अधिकारी मा. किशोर डोंगरकर यांच्यासह वणी व मारेगाव येथील 15 ते 20 सरपंच तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

या दौऱ्यात कैलास डोंगरकर यांनी आपल्या शेतातील विविध प्रयोगांची माहिती मान्यवर पाहुण्यांना दिली. केसर व राजापुरी आंबा, कालीपट्टी चिकू, शेवगा, फणस, सॅप, तेजपत्ता मसाला पीक, सीताफळ अशा विविध फळपिकांची लागवड पाणी व मृदा व्यवस्थापनाच्या आधारे त्यांनी यशस्वीरित्या केली आहे. बांधावर फळपिक व्यवस्थापन व बांबू लागवडीची अभिनव पद्धत हे विशेष आकर्षण ठरले.

या प्रसंगी उपकृषी अधिकारी श्री. व्ही. डी. जुमनाके, श्री. एन. व्ही. आत्राम, प्रतिष्ठित शेतकरी श्री. पांडुरंग कोहळे तसेच अनेक स्त्री-पुरुष शेतकरी उपस्थित होते.

मान्यवर पाहुण्यांनी कैलास डोंगरकर यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करत अशा उपाययोजना आपल्या गावात राबविण्याचा संकल्प सरपंच व शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here