मारेगाव पोलिसांचा दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन व दुर्गा विसर्जन निमित्त रूट मार्च

0
408

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव  दसरा, धम्मचक्र परिवर्तन दिन व दुर्गा विसर्जन उत्सवाचे औचित्य साधून मारेगाव पोलिस ठाण्याच्या वतीने आज दिनांक २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.१५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आला.

या रूट मार्चमध्ये ३ पोलीस अधिकारी, २ जीपीएसआय, २१ पोलीस अमलदार तसेच २३ होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते. यावेळी शहरात कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.

पोलीस अधिकारी यांनी उपस्थित पोलीस व होमगार्ड यांना बंदोबस्ताच्या दृष्टीने मार्गदर्शन केले. आगामी उत्सव काळात शांतता, सौहार्द व सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या.

या रूट मार्चमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून उत्सव काळात पोलिसांचे नियोजन व तयारी दिसून आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here