समाजसेविका डॉ. राणा नूर सिद्धीकी यांची विशेष उपस्थिती
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथील नूरजहॉन बेगमसलाम अहेमद विधी महिला महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या सोहळ्यास सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त समाजसेविका आणि नूरजहाँ बेगम चॅरिटेबल ट्रस्टच्या सचिव डॉ. राणा नूर सिद्धीकी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.
कार्यक्रमात सर्व मान्यवर प्राध्यापकांनी महात्मा गांधीजींचे सत्य, अहिंसा व त्यागाचे विचार तसेच लालबहादुर शास्त्रींच्या ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेचे महत्त्व विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
प्रा. आडे सर, प्रा. धोटे सर, प्रा. कोरकार सर तसेच प्राध्यापिका स्मिता मॅडम, निदा मॅडम आणि रेश्मा मॅडम यांनी जयंतीचे महत्त्व व महापुरुषांच्या कार्याची माहिती प्रभावीपणे मांडली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून स्वागत करण्यात आले. डॉ. राणा नूर सिद्धीकी यांनी समाजातील स्त्री-शिक्षण व सामाजिक कार्याची गरज अधोरेखित करत विद्यार्थिनींना प्रेरणादायी संदेश दिला.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांद्वारे आणि भाषणांद्वारे गांधी-शास्त्री यांच्या विचारांना अभिवादन केले.
जयंती कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थिनी प्राध्यापकवर्ग व मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शेख मॅडम यांनी केले.