सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव:तालुक्यातील मोजा चोपण येथील शेतकरी कै. प्रभाकर आत्माराम निखाडे यांनी २२ मे २०२५ रोजी आत्महत्या केली होती. शासनाच्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना तात्काळ सानुग्रह मदत देण्याच्या निर्णयानुसार, दिवंगत निखाडे यांच्या कुटुंबास रुपये एक लाखांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
ही आर्थिक मदत वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांच्या हस्ते देण्यात आली. या वेळी आमदार देरकर यांनी निखाडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी झाल्याचे सांगितले. शासनाच्या सर्व योजना आणि मदतीचा लाभ शेतकरी कुटुंबांना मिळावा, यासाठी प्रयत्नशील राहू, असेही आमदार देरकर म्हणाले.

याप्रसंगी मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड, जिल्हाप्रमुख संजय निखाडे, तालुकाप्रमुख पुरुषोत्तम बुट्टे, संपर्कप्रमुख सचिन पचारे, तालुका सचिव दिवाकर सातपुते, खरेदी-विक्री संघाचे माजी उपाध्यक्ष शरद ताजने, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वसंतराव आसुटकर, उपतालुकाप्रमुख विजय अवताडे, संचालक गणोजी थेरे, जिल्हा समन्वयक सुधीर थेरे, अमोल आसुटकर, उत्तम देऊळकर, सचिन जोगी, अवी भाजपाले, चंद्रकांत थेरे, राजू आसुटकर आदी मान्यवर उपस्थित होते.