न्यायव्यवस्थेवरील हल्ला म्हणजे संविधानावरील हल्ला!

0
61

मारेगाव वंचित बहुजन आघाडीचा तहसील कार्यालयावर मोर्चा; देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव : देशाचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडी, तालुका मारेगावच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.या घटनेला भारतीय संविधान आणि न्यायदान प्रक्रियेवरील थेट हल्ला ठरवून, आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून सुरू झालेला हा मोर्चा जोशात तहसील कार्यालयावर पोहोचला.

न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीवर हल्ला म्हणजे भारतीय लोकशाही मूल्यांचा अवमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. “सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठावर सरन्यायाधीशांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न हा केवळ वैयक्तिक नाही, तर संस्थात्मक हल्ला आहे,” असे निवेदनात म्हटले आहे. आरोपीवर केवळ निलंबन न करता कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी ठाम मागणी सरकारकडे करण्यात आली.

मोर्चादरम्यान ‘भारतीय संविधान जिंदाबाद!’, ‘लोकशाही जिंदाबाद!’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे!’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.तहसील कार्यालयावर पोहोचल्यावर मारेगावचे तहसीलदार यांनी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन स्वीकारले. तसेच आमदार संजय देरकर यांनाही निवेदन सादर करण्यात आले.

या मोर्चात ज्ञानेश्वर मुन, अनिल खैरे, अभिषा निमसटकर, यशोधरा लिहीतकर, अनंता खाडे, रवी तेलंग, रेखाताई काटकर, शोभाताई दारुंडे, विप्लव ताकसांडे, संजय जीवने, अमरनाथ तेलतुंबडे, गौतम ताकसाडे, धम्मपाल दारुंडे, वसूमित्र वनकर, विजय खाडे, प्राणशील पाटील, गंगाधर तेलंग, चिंतामण वेले, सलीम अहमद कुरेशी, अजय चंदनखेडे, बबन हस्ते, रवी वनकर, राजानंद गांजरे, रमेश चिकाटे, सुमित हस्ते, दीक्षा गजभिये, कामिनीबाई खैरे, निळावती मुन, लक्ष्मीकांत तेलंग, राजू पाटील,

शेख दिलदार सेख शीकंदर, धीरज लोखंडे, धनराज मुन, विनेश मेश्राम, यशवंत भरणे, स्वाती दारुंडे, सुकेसनी लिहितकर, गौतम मालखेडे, अजबराव गजभिये, ईश्वर वानखेडे, दीपा तेलंग, ज्ञानेश्वर धोपटे, गौतम दारुडे, राहुल नंदुरकर, किरण लढे, कविता ताकसांडे, ताराबाई मेश्राम, पुष्पा ताकसाडे, वंदना रायपुरे, दीपा तेलंग, वंदना वासेकर, तात्याजी चिकाटे, सुनील वाघमारे, प्रफुल भगत, प्रवीण नरांजे, मनोज चंदनखेडे, गौतम कवाडे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची व शेकडो कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here