विदर्भ एस.पी.न्युज नेटवर्क डेस्क झरी जामणी
झरी जामणी तालुक्यातील माथाजुन मार्की जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सौ. वर्षा अॅड. प्रा. संजय मडावी यांच्या उमेदवारीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. उच्च शिक्षित महिला उमेदवार म्हणून त्यांची ओळख असून, समाजकारण आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी भक्कम पायाभरणी केली आहे.
लोकप्रिय समाजसेवक आणि शिक्षणतज्ज्ञ अॅड. प्रा. संजय मडावी हे गेल्या पंधरा वर्षांपासून जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. नागरिकांच्या अडचणींवर तत्काळ मदत करणे, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले, निराधार, श्रावण बाळ योजना, अपंग व्यक्तींना सहाय्य, विविध सरकारी योजना यांचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे अशी अनेक जनकल्याणकारी कामे त्यांनी केली आहेत.
सौ. वर्षा मडावी यांच्या उमेदवारीमुळे तालुक्यातील सर्व स्तरातील जनतेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, महिला आणि युवक या सर्व घटकांमध्ये त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “अॅड. प्रा. संजय मडावी हे जनतेच्या सुख-दुःखात सदैव सोबत असतात. त्यांचे कार्य आणि जनसेवेची भावना हाच त्यांचा खरा ठेवा आहे,” असे सांगण्यात येते.
झरीजामणी तालुक्यातील माथाजुन मार्की मतदारसंघात या दाम्पत्याविषयी वाढता विश्वास दिसून येत असून, त्यांच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत एक नवा उत्साह आणि जनतेत ऐक्याचे वातावरण निर्माण झाले आहे.


