आ.संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास, शेकडो कार्यकर्त्यांचा भगवा धारण
विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क डेस्क,वणी
वणी-आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षात मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे. भालर वसाहत, नायगाव (बु.) व बोरगाव या परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी बुधवारी (29 ऑक्टोबर) शिवसेनेत प्रवेश केला. आमदार संजय देरकर यांच्या निवासस्थानी आयोजित सोहळ्यात कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा स्विकारत पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा केली.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी शिवसेना (उबाठा)तर्फे जोरदार तयारी सुरू आहे. आमदार संजय देरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार केला.

उप जिल्हा समन्वयक सहकार सेना संजय देठे, प्रफुल्ल बदखल, अक्षय लांडे यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. तसेच युवा सेना वणी विधानसभा समन्वयक आयुष ठाकरे यांच्या समन्वयातून नांदेपेरा–वेल्हाळा गटातून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
“शिवसेना (उबाठा) हा केवळ पक्ष नाही, तर जनतेचा विश्वास आहे. विकास, पारदर्शकता आणि निष्ठेचे नेतृत्व देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कार्यकर्त्यांच्या साथीनं आगामी निवडणुकीत भगवा नक्कीच फडकेल,”
— आ. संजय देरकर, आमदार, वणी विधानसभा
पक्ष प्रवेश केलेल्यांमध्ये भालर वसाहतीतून रितेश मत्ते, नवरत्न भावरकर, राम सिंग, रोहित येवले, रोहित मत्ते, मोहित गौतम, उनेर शेख, प्रवीण गायकवाड, सहयोग नांदे, पवन डाहुले, प्रफुल्ल डावरे, आशिष विधाते, भाविक लोडे, भूषण टोंगे, बंडू बोबडे, अमोल तोडासे, नायगाव (बु.) येथून पवन इखारे, सक्षम चोपणे, रवींद्र डाहुले, वैभव देठे, निशांत तुराणकर, गजानन चोपणे, अंकुश देठे, आशुतोष तुराणकर तर बोरगाव येथून ओंकार खोकले, श्रीकांत करपते, चेतन बोधे, राम बदखल, कुणाल चिंचोलकर, लक्ष्मण दोडके यांचा समावेश आहे.पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना (उबाठा)चे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


