मारेगाव तालुका काँग्रेसच्या नेतृत्वाची नवी धुरा वसंतराव आसुटकर यांच्या हाती

0
984

आगामी निवडणुकांवर सर्वांचे लक्ष”

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मोठा बदल करण्यात आला असून ज्येष्ठ व निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ते वसंतराव आसुटकर यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवड समितीच्या मुलाखतीत आसुटकर हे एकमेव उमेदवार होते आणि त्यांच्या कार्यशैलीवर पक्ष नेतृत्वाने विश्वास व्यक्त केला.

वसंतराव आसुटकर हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात सक्रीय असून निष्ठा, शिस्त आणि तळमळीने काम करणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सध्या ते मारेगाव बाजार समितीचे संचालक, मार्डी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तसेच मारेगाव इंदिरा स्मृती मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही यशस्वी काम पाहत आहेत.

काँग्रेस पक्षाने आता तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्या हाती सोपवल्याने आगामी निवडणुकांमध्ये पक्ष बळकटीकरण आणि संघटन विस्ताराचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. पंधरवड्याच्या आत नवी तालुका कार्यकारिणी जाहीर होणार असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, वसंतराव आसुटकर यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत असून अनेक कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here