ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

संभाजीनगरहून मुली गायब होण्यामागे MIM?:उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा संशय; मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


छत्रपती संभाजीनगर येथून मुली गायब होण्यामागे एमआयएमचा हात असल्याचा संशय सत्ताधारी शिवसेनेचे नेते तथा शहराचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी व्यक्त केला आहे. एमआयएमने धर्मांतर, लैंगिक शोषण व इतर गंभीर आरोप असणाऱ्यांना आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर शहरातून बेपत्ता झालेल्या मुलींमागे एमआयएमचा हात आहे का? याची चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणालेत. त्यांच्या या आरोपामुळे शहराचे राजकारण चांगलेच तापले आहे. टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान हिला गुरुवारी रात्री छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली. ती एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांनी खरेदी केलेल्या एका घरात बिनधोकपणे राहत होती. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी या प्रकरणाचा संबंध थेट एमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता शिवसेना जिल्हाप्रमुख तथा संभाजीनगरचे महापौर राजेंद्र जंजाळ यांनीही या प्रकरणी एमआयएमला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. बेपत्ता मुली, महिलांमागे एमआयएमचा हात? राजेंद्र जंजाळ म्हणाले, एमआयएमने धर्मांतर व लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप असणाऱ्या एका आरोपीला आश्रय दिला. त्यांची ही भूमिका असेल तर गंभीर गोष्ट आहे. छत्रपती संभाजीनगर येथून गत काही महिन्यांत अनेक अल्पवयीन मुली व महिला बेपत्ता झाल्या आहेत. अनेक पोलिस ठाण्यांत मिसिंगच्या तक्रारी दाखल आहेत. पण अद्याप त्यांचा शोध लागला नाही. मग यामागे एमआयएम आहे का? याची चौकशी झाली पाहिजे. एमआयएमनेही या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हे प्रकरण केवळ निदा खानला आश्रय देण्यापुरते मर्यादित नाही. मतीन पटेलच्या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ आहेत. या व्हिडिओच्या बळावर त्याने महिलांना ब्लॅकमेल केल्याच्या तक्रारी आहेत. एमआयएमच्या एका नगरसेवकावर 307 चा गुन्हा आहे. दुसऱ्या एका नगरसेवकाची मुंबईच्या ड्रग माफियासोबत भागीदारी आहे. एमआयएमचे लोक असे बेकायदा कामे करतात. ते गुन्हेगारांनाच आपल्या पक्षात घेतात व त्याला उमेदवारी देतात. मागच्या वेळीही एमआयएमचे काही गुन्हेगार नगरसेवक सभागृहात होते. एमआयएम हा गुंड व विघातक कृत्य करणाऱ्या लोकांचा पक्ष आहे, असे राजेंद्र जंजाळ ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना म्हणाले. मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर फिरणार राजेंद्र जंजाळ यांनी निदा खान प्रकरणातील सहआरोपी नगरसेवक मतीन पटेल यांचे घर अनधिकृत असल्याचा दावा करत ते पाडण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले. मतीन पटेल यांचे कार्यालय व निदा खानला ज्या घरात लपवण्यात आले होते, ते घर अवैध व अनधिकृत आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कायद्यानुसार महापालिका त्यावर कारवाई करेल. तशी नोटीस मतीन पटेल यांच्या घरावर लावण्यात आली आहे. या नोटीसीला उत्तर देण्यासाठी संबंधितांना 3 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. चौथ्या दिवशी मतीन यांच्या घरासह कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात येईल, असे ते म्हणाले. निदा खान 40 दिवसांपासून संभाजीनगरात जंजाळ पुढे म्हणाले, निदा खान प्रकरण दिसते तेवढे सोपे नाही. पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 9 एफआयआर दाखल केलेत. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आणून 40 दिवस लपवून ठेवले. त्यामुळे आरोपींनी या प्रकरणातील पुरावे नष्ट केल्याची शक्यता नाकारता येत नाही. असे कृत्य झाल्याचे स्पष्ट झाले तर पोलिसांनी सदर व्यक्तींवर कारवाई केली पाहिजे. ओवैसी व इम्तियाज जलील यांनी निदा खान व मतीन पटेल यांची पाठराखण केली. या प्रकरणी एमआयएमची भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असे ते म्हणाले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर