ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

दंड नाही तर थेट हार घालून स्वागत:हेल्मेट सक्तीसाठी अनोखी कारवाई

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रस्ते सुरक्षा आणि हेल्मेट वापराबाबत जनजागृती करण्यासाठी तिवसा येथील पंचवटी चौकात आरटीओ विभाग व तिवसा पोलिस प्रशासनाच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. विशेष म्हणजे, हेल्मेट न घालता दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांना थांबवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले आणि हेल्मेट वापरण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच सुरक्षित वाहन चालविण्याचा संदेश सकारात्मक पद्धतीने पोहोचविणे हा आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनधारकांना पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. भविष्यात स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नियमित हेल्मेट वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सामान्यतः वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र तिवसा येथे सकारात्मक आणि लोकाभिमुख पद्धतीने जनजागृती करण्यासाठी हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आल्याने नागरिकांमध्ये या उपक्रमाची चांगलीच चर्चा रंगली आहे. अनेक वाहनचालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात हेल्मेट वापरण्याचा संकल्प व्यक्त केला. तिवसा शहरातील पंचवटी चौकात झालेल्या या उपक्रमामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबत प्रभावी संदेश समाजात पोहोचला असून नागरिकांकडून आरटीओ व पोलिस प्रशासनाच्या या अभिनव जनजागृतीचे कौतुक करण्यात येत आहे. आक्रमक पोलिसांद्वारे संवाद आरटीओ व पोलिस अधिकारी एरवी नियमांवर बोट ठेऊन वाहनधारकांशी आक्रमक स्वरुपात सादर होतात. परंतु आज मात्र त्यांनी वाहनचालकांशी संवाद साधत हेल्मेटचे महत्त्व पटवून दिले. अपघाताच्या वेळी गंभीर दुखापतींपासून डोक्याचे संरक्षण करण्यासाठी हेल्मेट अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचेही संवादादरम्यान नमूद केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर