ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

14 केंद्रांवर 4,770 विद्यार्थी देणार आज ‘नीट’ची परीक्षा:पेपर पोहोचवण्यासाठी 14 सुरक्षित गाड्यांची सोय‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील १४ केंद्रांवर ४ हजार ७७० विद्यार्थी रविवारी २१ जून रोजी नीटची पुर्नपरीक्षा देतील. ही परीक्षा सुरक्षित, शांततेत व्हावी यासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. परीक्षेशी संबंधित सर्वच विभागांचा एकमेकांशी संपर्क असावा, यासाठी शनिवारी २० रोजी मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्यांनी आपले मोबाईल क्रमांक एकमेकांकडे दिले. त्यामुळे संपर्क साधण्यास मदत होणार आहे. रविवारी २१ जून रोजी लॉकरमधून नीटचे पेपर केंद्रांवर पाठवताना कोणतीही अडचण येऊ नये, हाच यामागील मुख्य उद्देश असल्याचे आरडीसी संतोष काकडे यांनी सांगितले. प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस अधिकाऱ्यांच्या हाती सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. विद्यार्थ्यांना सकाळी ११ वाजतापासून दु. १.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचायचे आहे. दु. २ ते ५ या कालावधीत पेपर होणार आहे. केंद्रावर प्रवेश करण्याआधी विद्यार्थ्यांची बायोमॅट्रीक तपासणी होईल. प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून त्याला परीक्षा केंद्राच्या आत सोडले जाणार आहे. शहरात नीटच्या परीक्षेचे १४ केंद्र असून प्रत्येक केंद्रावर वेगळी गाडी पेपर घेऊन जाणार असून प्रत्येक गाडीला पोलीस व्हॅनचे संरक्षण मिळणार आहे. बँकेतील लॉकरमधून पेपर काढल्यानंतर ते संबंधित केंद्रात पोहोचेपर्यंत संपूर्ण यंत्रणा कार्यांवित राहणार आहे. प्रत्येक केंद्रांवर पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच केंद्राजवळ विद्यार्थ्यांशिवाय इतरांना भटकताही येणार नाही. सीसीटीव्ही कॅमेरे तसेच विद्यार्थ्यांच्या बायोमॅट्रीक तपासणीची सोय करण्यात आली.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर