ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

आत्रामांनी 5 खासदारांची नावे सांगावी:ते माझ्याशी बोलले तर आम्ही 8 ही जण येऊ, खासदार फुटीच्या दाव्याची सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दिल्लीमध्ये इंडिया आघाडीचे सर्व नेते एकमेकांच्या संपर्कात असतो. आम्ही सर्व जण खरगे यांच्या ऑफीसमध्ये बसून चर्चा करत असतो, कोण काय बोलणार, कोणत्या बिलावर चर्चा करणार यावर आम्ही सर्व काही ठरवतो, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे 5 खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊ शकतात असे धर्मरावबाबा आत्रात यांनी म्हटले असेल तर त्यांना माझ्या पेक्षा जास्त माहिती असेल, आता काही घडून यायचा विषय नाही. त्यांच्यकडे जर 5 खासदार कोण ही माहिती असेल तर त्यांनी नाव सांगावे. मी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास तयार आहे, ते माझ्याशी बोलत नाही माझ्याशी बोलले तर आम्ही 8 ही जण येऊ, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ..लोकशाही संपुष्ठात आली सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आपल्या देशात लोकशाही संपुष्ठात आली आहे का असे आम्हाला वाटते आहे आहे. घरं, पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे. निवडणूक 3 वर्षांवर आलेली असताना पक्ष फोडण्याची घाई कसली आहे. एखाद्या चांगल्या बिलसाठी विरोधी पक्षसुद्धा मदत करत असतो. जीएसटीचे बिल ज्यावेळी आले त्यावेळी काँग्रेसने सुद्धा सरकारला मदत केली आणि एकमताने बिल पास केले. पण एक बिल पास करण्यासाठी पक्ष फोडण्याचे काम सुरू झाल्याने देशात लोकशाही आहे का नाही असा प्रश्न पडतो. ..तर जनतेसाठी कोण बोलणार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सर्वच जण सत्ताधारी पक्षात गेले तर लोकांसाठी बोलणार कोण? विरोधी पक्ष राहणारच नाही ना, अशी परिस्थिती देशात झाली आहे. मविआच्या बैठकीसंदर्भात शशिकांत शिंदे यांना आमच्या आमदारांबद्दल सर्व माहिती होती. या प्रकरणी सतेज पाटील आणि शशिकांत शिंदे मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधतील. सरकारकडून एनसीआरटीचा गैरवापर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकारकडून एनसीआरटीचा सातत्याने गैरवापर करतंय असे मत शिक्षणतज्ञ करत आहेत. सरकारकडून त्यांची विचारधारा शिक्षणाच्या माध्यमातून नवीन पिढीवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्ताधारी या मार्फत नवे गणित बांधायचा प्रयत्न करत आहेत ते नव्या पिढीच्या विचारधारेसाठी हे घातक ठरू शकते. सहकारमध्ये राजकारण करू नये सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बँकेची निवडणूक ही सहकारचे निवडणूक असते. मुंबई बँकेचा विचार केला तर त्यामध्ये सर्व पक्षाचे नेते आहेत. सहकारमध्ये राजकारण आणू नये हीच आमची भूमिका राहिलेली आहे. यामध्ये पक्ष बाजूला असला पाहिजे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 23 महिन्याच्या मुलाला दुसऱ्या मुलाने जी मारहाण केली अशी घटना कुठल्याही शाळेत होऊ नये.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर