ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

वांद्रे येथील गरीबनगरमधील रेल्वे हद्दीतील अतिक्रमणावर अखेर बुलडोझर:कोर्टाच्या आदेशानंतर पश्चिम रेल्वेची धडक कारवाई

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईतील वांद्रे पूर्व येथील गरीबनगर परिसरात रेल्वे रुळांलगत असलेल्या बेकायदेशीर अतिक्रमणावर पश्चिम रेल्वेकडून अखेर धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. 2017 पासून सुरू असलेल्या प्रदीर्घ कायदेशीर प्रक्रियेनंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीने ही मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या परिसरातील रेल्वे रुळांशेजारील भीषण अतिक्रमणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, ज्याची गंभीर दखल घेत आता रेल्वेने हे अतिक्रमण हटवण्यासाठी दोन दिवसीय मोहीम सुरू केली आहे.
वांद्रे रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वेच्या हद्दीत तब्बल 5 हजार स्क्वेअर मीटर जमिनीवर हे अतिक्रमण पसरले असून, यात सुमारे 409 पक्क्या झोपड्या आणि दुकानांचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेने ‘पब्लिक प्रिमायसेस ॲक्ट 1971’ अंतर्गत ही जमीन रेल्वेचीच असल्याचे सिद्ध केले होते.
मात्र, राजकीय पाठबळामुळे स्थानिक नागरिकांनी हायकोर्टात धाव घेतल्याने अनेक वर्षे ही कारवाई रखडली होती. अखेर न्यायालयाचा हिरवा कंदिल मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हे बेकायदेशीर बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.
या कारवाईमुळे झोपडपट्टीतील अनेक नागरिक बेघर होणार असून, कारवाईच्या भीतीने रहिवाशांनी आधीच आपली घरे रिकामी करण्यास सुरुवात केली होती. नागरिकांनी घरातील कुलर, फ्रीज आणि इतर संसार रस्त्यावर आणून ठेवल्याने परिसरात मोठी तारांबळ उडाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वांद्रे रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या या वस्तीमुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. येथील रहिवासी घरातील आणि लघुउद्योगांमधील कचरा थेट रेल्वे ट्रॅकवर फेकत असल्याने, येथे सतत आगी लागण्याच्या दुर्घटना घडत होत्या आणि रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता.
दरम्यान, रेल्वेच्या या कारवाईला स्थानिक नागरिकांकडून तीव्र विरोध केला जात असून परिसरात संतापाचे वातावरण आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी वांद्रे परिसरात मोठा पोलीस फौजफाटा आणि दंगल नियंत्रण पथकाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
स्थानिक नेते आणि पदाधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही कारवाई सुरू असताना या परिसराला भेट देऊन पाहणी केली. सध्या पोलीस बंदोबस्तात ही अतिक्रमण विरोधी मोहीम वेगाने सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर