ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…

6 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अभिजीत पोते, प्रतिनिधी, पुणे: राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण ढवळून निघणार असल्याचे संकेत आहेत. काही मराठा-कुणबी जातप्रमाणपत्र पडताळणीत रद्द झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत राज्यात दौरे सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे आज पुण्यात ओबीसी संघटनांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण देण्याच्या मागणीला जोरदार विरोध करण्यासाठी आता ओबीसी समाजही एकवटला आहे. याच मुद्द्यावर पुढील रणनीती आखण्यासाठी आज पुण्यात ओबीसी समाजाची अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुण्यातील पत्रकार भवन येथे आज दुपारी २ वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. या बैठकीला ओबीसी हक्क आंदोलनाचे प्रमुख नेते लक्ष्मण हाके आणि मंगेश ससाणे यांच्यासह राज्यभरातील ओबीसी समाजाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा होणार?
मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यास ओबीसी नेत्यांचा तीव्र विरोध आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी आरक्षणाचे संरक्षण कसे करायचे आणि मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून राज्यभरात कशा प्रकारे रान उठवायचे, याची रणनीती या बैठकीत ठरवली जाणार आहे. आजच्या या बैठकीनंतर ओबीसी समाजाकडून एखाद्या मोठ्या राज्यस्तरीय आंदोलनाची घोषणा केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आज पुण्यातील पत्रकार भवनात होणाऱ्या या बैठकीकडे लागले आहे.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर