ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

परळी धनुभाऊंना दिली, मी माळाकोळी सांभाळेन:पंकजा मुंडे यांच्या विधानाची खमंग चर्चा; लोहा विधानसभा लढवणार का? असा सवाल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकली. आता ते परळी सांभाळतात आणि मी माळाकोळी सांभाळेन, असे विधान भाजप नेत्या तथा राज्याच्या कॅबिनेट पंकजा मुंडे यांनी सोमवारी केले आहे. परळी विधानसभा मतदारसंघ हा पंकजा यांचा होता. पण सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांनी तो ताब्यात घेतला. त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचे सातत्याने प्रयत्न केले. पण आता त्यांनी चक्क परळी धनंजय मुंडेंना देऊन टाकल्याचे सूतोवाच केल्याने त्यांच्या विधानाची खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बीड जिल्ह्यातील परळी तालुका हा मुंडे कुटुंबीयांचा राजकीय गड म्हणून ओळखला जातो. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी येथूनच आपल्या राजकारणाची सुरुवात केली. त्यांच्यानंतर पंकजा मुंडे यांनी या मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि हा मतदारसंघ धनंजय मुंडे यांच्याकडे आला. त्यानंतर पंकजा यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेण्याचा अतोनात प्रयत्न केला. त्यांनी वेळोवेळी आपल्या मनातील सल बोलूनही दाखवली. पण आता राज्याच्या राजकारणातील बदलत्या स्थितीत त्यांनी परळी धनंजय मुंडे यांना देऊन टाकल्याचे विधान केले आहे. मला माळाकोळीवर प्रेम करू द्या पंकजा मुंडे यांनी सोमवारी नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथील गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी माजी आमदार गोविंद केंद्रे, धनंजय मुंडे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. पंकजा यावेळी बोलताना म्हणाल्या, मुंडे साहेबांनी माळाकोळीवर प्रेम केले. त्यामुळेच मी येथील पाणी पुरवठा योजना पूर्ण करू शकले, कारण ते वचन साहेबांनी दिले होते. परळी एवढेच मी माळाकोळीवर प्रेम करते. आता परळीवर प्रेम धनुभाऊंना करू द्या. मी त्यांना ती देऊन टाकली आहे. मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. परळी हा धनंजय मुंडेंचा मतदारसंघ आहे. त्यांनी त्याच्यावर प्रेम करावे. मी माळाकोळीवर प्रेम करते. कदाचित माळाकोळी माझ्यावर परळीहून जास्त प्रेम करेल, असे त्या म्हणाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे माळाकोळी हा लोहा विधानसभा मतदारसंघाचा भाग आहे. हा मतदारसंघ परळी तालुक्याला चिकटूनच आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भविष्यात लोहा विधानसभा मतदारसंघातून लढणार का? असा प्रश्न या प्रकरणी उपस्थित केला जात आहे. धनंजय मुंडेंना अडचणीत साथ दिली पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, धनंजय मुंडे अडचणीत असताना मी मागचे सर्वकाही विसरून त्याच्या जखमेवर मलम लावण्याचा प्रयत्न केला. गोपीनाथ मुंडे यांनी शिकवलेल्या त्यागाच्या भावनेतूनच मी व धनुभाऊ एकत्र आलो. ते डीएम आहेत, तर मी पीएम आहे. धनंजय मुंडे हे गोविंद केंद्रे यांचे मेहुणे आहेत. आज मेहुण्याचा चेहरा पाहून त्यांचाही चेहरा खुलला. पण केंद्रे यांनी मेहुण्यापेक्षा गोपीनाथ मुंडे यांच्यावरील प्रेमाखातर त्यांनी नेहमीच त्यांची साथ दिली हे मी कधीही विसरू शकत नाही. गोपीनाथ मुंडेंना आपल्यातून जाऊन आज 12 वर्षे झाली. त्यानंतरही आज त्यांचा पुतळा उभारला जातो हे प्रेम पाहून मी भारावले. गोपीनाथ गड हा माझ्या एकटीच्या मालकीचा नाही. तो मुंडे कुटुंब किंवा धनंजय मुंडे यांच्याही मालकीचा नाही. तो तुमचा आहे. या गडाची प्रत्येक वीट तुमच्या खर्चाने रचली गेली आहे. तुम्हाला एक हक्काचे ठिकाण मिळावे या उद्देशाने गोपीनाथ गडाची उभारणी करण्यात आली आहे, असे पंकजा म्हणाल्या.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर