ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

मार्डीत १५ जानेवारीपासून भव्य कबड्डी स्पर्धेचा रणसंग्राम

6 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

तीन लाखांची बक्षिसे

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे १५ जानेवारीपासून न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळाच्या वतीने भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जि. प. शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा पार पडणार असून ओपन पुरुष गट, ६० किलो आतील पुरुष गट आणि महिला खुला गट अशा तीन गटांत सामने खेळविण्यात येणार आहेत.

पुरुषांच्या ओपन गटात प्रथम बक्षीस ५१ हजार रुपये (खासदार श्रीमती प्रतिभाताई धानोरकर), द्वितीय ३१ हजार रुपये (मारोतराव गौरकार, गौरव आसेकर, रायल सय्यद), तृतीय २१ हजार रुपये (मंगेश हरणे, नागपूर) आणि चतुर्थ ११ हजार रुपये (रवीभाऊ धानोरकर) देण्यात येणार आहेत.

६० किलो आतील पुरुष गटात प्रथम ४१ हजार रुपये (अरविंद ठाकरे, सरपंच कुंभा), द्वितीय ३१ हजार रुपये (गौरीशंकर खुराणा), तृतीय २१ हजार रुपये (अंकुश माफूर व आकाश बदकी) आणि चतुर्थ ११ हजार रुपये (मयुरभाऊ ठाकरे) अशी बक्षिसांची रचना आहे.

महिला खुल्या गटात प्रथम ३१ हजार रुपये (हबीबखा जमालखा पठाण, नागपूर), द्वितीय २१ हजार रुपये (सारंग ठाकरे, वरोरा), तृतीय १५ हजार रुपये (डॉ. राजू देशपांडे, वणी) आणि चतुर्थ ११ हजार रुपये (सुरेंद्र काकडे, चनोडा) अशी रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. तसेच तिन्ही गटांतील विजेत्या संघांना चषक प्रदान करण्यात येणार असून हे चषक सुरेश चांगले, सुरेश मुरस्कर व अनंता जुमळे यांच्या वतीने दिले जाणार आहेत.

याशिवाय बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर व बेस्ट ऑलराऊंडर पुरस्कार अयुबखाँ पठाण, अखिलेश कांबळे व राजकुमार बोबडे यांच्या वतीने दिले जाणार आहेत. बेस्ट प्लेयर ऑफ द टूर्नामेंटला अक्षय मोबाईल शॉपी, वणी यांच्या वतीने होम थिएटर देण्यात येणार आहे. अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचला सायकल भेट दिली जाणार आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क अ गट १००० रुपये, ब गट ९०० रुपये, महिला गट ७०० रुपये, लेट फी १५०० रुपये तर तक्रार फी ३००० रुपये ठेवण्यात आली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी अध्यक्ष अक्षय सराटे (८३९०८९५०४२) किंवा सचिव समाधान सिरामे (९०२२६९९६२३) यांच्याशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ, मार्डी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर