ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

जगातील पहिली डोपिंग फ्रेंडली स्पर्धा, क्रीडा जगतात संताप:42 टॉप जलतरणपटू, धावपटू आणि वेटलिफ्टर ड्रग्ज-स्टेरॉइड्स घेऊन सहभागी; 11,460 कोटी रुपये पणाला

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जोखीम आणि नफ्याच्या पायावर उभ्या असलेल्या लास वेगास शहरात सध्या एका विचित्र खेळाची पटकथा लिहिली गेली. लेखक होते 48 वर्षीय अब्जाधीश बायो-हॅकर ख्रिश्चन एंगरमेयर… सकाळी उठून ते स्वतःला वजन कमी करणारी औषधे, टेस्टोस्टेरॉन आणि कायदेशीर वाढीचे हार्मोन्स इंजेक्ट करतात. लक्ष केंद्रित करण्यासाठी स्लीप ॲप्नियाचे औषध आणि लोकांशी मिसळण्यासाठी ‘ऑक्सिटोसिन’ची मदत घेतात. एंगरमेयर स्वतः 48 व्या वर्षी 38 वर्षांचे दिसतातच, पण आता ते संपूर्ण जगाला ‘बायो-हॅकिंग’चे वेड लावण्यासाठी निघाले आहेत. ते ‘एनहॅन्स्ड गेम्स’चे संस्थापक आहेत. गेल्या रविवारी झालेल्या या अनोख्या स्पर्धेत ॲथलीट्सना ड्रग्स, स्टेरॉइड्स, हार्मोन्स आणि पेप्टाइड्स घेण्यावर कोणतेही बंधन नव्हते, उलट त्यांना उघडपणे हे घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेची उघडपणे ‘डोपिंगला प्रोत्साहन’ देण्यासाठी तयारी करण्यात आली. पहिल्यांदाच झालेल्या या आयोजनात जगभरातील 42 आघाडीच्या जलतरणपटूंनी, धावपटूंनी आणि वेटलिफ्टर्सनी भाग घेतला, ज्यात अनेक ऑलिंपिक पदक विजेतेही होते. यापैकी 91% टेस्टोस्टेरोन आणि 79% ह्यूमन ग्रोथ हार्मोनच्या मोठ्या डोसवर आहेत. ग्रीक ऑलिंपिक जलतरणपटू क्रिस्टियन गोलोमेवने गुप्त चाचणीदरम्यान 50 मीटर फ्रीस्टाइलमध्ये 20.89 सेकंदांची वेळ नोंदवून अधिकृत जागतिक विक्रम दोन शतांश सेकंदांनी मोडला, ज्यासाठी त्याला सुमारे 9.55 कोटी रुपयांचा बोनसही मिळाला. कंपनीचे 29 वर्षीय सीईओ मॅक्स मार्टिन म्हणतात, ‘हे नवोपक्रम केवळ खेळाडूंसाठी नाही. हे त्या आजोबांसाठीही आहे ज्यांना आपल्या नातवासोबत पार्कमध्ये धावण्यासाठी ऊर्जा हवी आहे.’ दिग्गजांनी केली गुंतवणूक, 650 लाख कोटींच्या वेलनेस उद्योगावर नजर ११,४६० कोटी रुपयांच्या मूल्यांकनासह सार्वजनिक झालेल्या एनहॅन्स्ड गेम्स इंक कंपनीमागे सिलिकॉन व्हॅलीचे दिग्गज अब्जाधीश पीटर थिएल आणि ट्रम्प ज्युनियर यांच्या भागीदारीतील ‘१७८९ कॅपिटल’ या व्हेंचर फर्मचा हात आहे. अँगरमेयर याचे सह-संस्थापक आहेत. १९१ कोटी रुपये खर्चून झालेल्या या कार्यक्रमाचा उद्देश खेळ नसून, एक व्यावसायिक साम्राज्य उभे करणे हा आहे. कंपनीचे टेलीहेल्थ प्लॅटफॉर्म ‘एनहॅन्स्ड’ लवकरच सामान्य लोकांना टेस्टोस्टेरॉन आणि अँटी-एजिंग सप्लिमेंट्स विकेल. ६५० लाख कोटी रुपयांच्या जागतिक वेलनेस उद्योगाचा फायदा घेण्यासाठी या स्पर्धेने ‘थेट जाहिरात’ म्हणून भूमिका बजावली. चुकीचा संदेश जाईल या कार्यक्रमामुळे क्रीडा जगतात आणि वैद्यकीय तज्ञांमध्ये संताप आहे. अमेरिकन अँटी-डोपिंग एजन्सीचे प्रमुख ट्रॅव्हिस टायगार्ट यांचे मत आहे की, यामुळे मुलांमध्ये चुकीचा संदेश जाईल की खेळात पुढे जाण्यासाठी ड्रग्ज आवश्यक आहेत. वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सीने इशारा दिला आहे की, जरी ही औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिली जात असली तरी, त्यांच्या कॉकटेलमुळे भविष्यात हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, यकृताचे नुकसान आणि अचानक मृत्यूचा धोका वाढतो.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर