ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ अनैतिक संबंधांचा वाद, पत्नीला झोपेतच संपवलं, मग 65 वर्षाच्या पतीचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं!
SP News Maregaon

घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण!

637 Views
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

कापूस वेचणीसह रब्बी हंगामातील कामांवर भीतीचे सावट; माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल

सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव तालुक्यातील घोडदरा येथील शेतशिवारात वाघाच्या पायाचे ठसे (पगमार्क) आढळून आल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
घोडदरा येथील शेतकरी रामकिसन राऊत यांच्या शेतात वाघाच्या पंजाचे ठसे आढळून आले. शेतात कामासाठी गेले असताना त्यांच्या निदर्शनास हे ठसे आले. परिसरात वाघाचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता त्यांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारीव अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी करून आढळलेल्या ठशांची चौकशी केली. दरम्यान, कापूस वेचणीचा हंगाम सुरू असून रब्बी पिकांच्या मशागतीची कामेही शेतशिवारात सुरू आहेत. अशा परिस्थितीत वाघाच्या पगमार्कमुळे शेतात जाणाऱ्या शेतकरी व मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन
शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकट्याने जाणे टाळावे, शक्यतो समूहाने जावे, लहान मुलांना शेतशिवारात एकटे पाठवू नये तसेच पगमार्क किंवा वन्यप्राण्याच्या हालचाली दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा माग काढण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारची माहिती तातडीने वनविभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
घोडदरा परिसरातील शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने परिसरातील संभाव्य वाघाच्या हालचालींची तपासणी करून आवश्यक खबरदारी व मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर