बातमी ऐका (Marathi Voice Reader)
Harishchandragad KokanKada Death Case : लोहगडावरील सिया गोयल प्रकरणानंतर अनेकांच्या मनात ट्रेकिंगचा धास्ती बसली आहे. परंतू अजूनही अनेकजण हरिश्चंद्रगडासारख्या किल्ल्यांवर आपली ट्रेकिंगची आवड जपण्यासाठी जातात. महाराष्ट्रातील हिमालय म्हणावं असा हरिश्चंद्रगड कोकणकड्यासाठी प्रसिद्ध आहे. हिवाळ्यात हरिश्चंद्रगड जाणं म्हणजे एक सुंदर अनुभव पण याच हरिश्चंद्रगडाची माहिती नसल्याने अनेक ट्रेकर्स फरले अन् अनेक दिवस अडकल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे हरिश्चंद्रगड जेवढा सुंदर तेवढाच भयावह देखील आहे. अशातच आता हरिश्चंद्रगड मृत्यूचं केंद्रबिंदू ठरतोय का? असा सवाल विचारला जातोय.
20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू
अशातच आता हरिश्चंद्रगडावरून एका 20 वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. कोकण कड्याच्या खोल दरीत राजस्थानमधील 20 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. खुशाल चेनाराम प्रजापती असं या मृत तरुणाचे नाव आहे. मुंबई-इगतपुरीमार्गे प्रवास करत शनिवारी दुपारी राजूर येथे आला होता. हॉटेलचालकाच्या फोनवरून त्याने आई आणि वडिलांना फोन केला होता अन् कुणीतरी आपल्याला ब्लॅकमेल करतंय, असं म्हटलं होतं. तो एका खासगी वाहनाने तिथं गेला होता.
कोण ब्लॅकमेल करत होतं?
त्यानंतर मुलाचा फोन न आल्याने किंवा त्याचा पत्ता न लागल्याने, खुशाल बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलिसांत दिली होती. वन कर्मचाऱ्यांना कोकणकड्याच्या खोल दरीत मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी राजूर पोलिसांना कळवलं. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाची ओळख पटवली अन् एकच आक्रोश पहायला मिळाला. त्यानंतर लोणावळ्यातील अनुभवी ट्रेकर्सच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढला गेला. मात्र, खुशाल प्रजापती याला कोण ब्लॅकमेल करत होतं? हा प्रश्न अजुनही कायम आहे.
सहा महिण्यापुर्वी बेपत्ता पर्यटकाचा शोध
दरम्यान, हरिश्चंद्रगडावर कोकणकड्यावरील 800 फुट खोल दरीत सहा महिण्यापुर्वी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेताना सिल्वासाचा रोहित सोळुंके आणि लांतुरचा गणेश होनराव या दोघा तरुणाचे सांगाडे सापडले होते. तसेच गेल्या काही वर्षापासून काही लोकांनी या कड्यावरून पडून आयुष्य संपवल्याची देखील माहिती समोर आली होती. कोकणकड्याला ग्रील लावलं असताना देखील लोक पुढं जाऊन कड्यावर बसण्याचा प्रयत्न करतात, हा जीवघेणा प्रकार लोकांच्या अंगलट येताना दिसत आहे.