ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ अनैतिक संबंधांचा वाद, पत्नीला झोपेतच संपवलं, मग 65 वर्षाच्या पतीचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं!
SP News Maregaon

मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक!

1 View
🔊 बातमी ऐका (Marathi Voice Reader)

खडकी टेकडीवर अपघात; रोही गंभीर जखमी, वनविभागाकडून तातडीने मदत

सुरेश पाचभाई | मारेगाव
मारेगाव : मारेगाव–यवतमाळ राज्य महामार्गावर वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खडकी ते बुरांडा दरम्यानच्या खडकी टेकडी परिसरात शुक्रवारी (दि. २० नोव्हेंबर) रस्ता ओलांडणाऱ्या रोह्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात रोही गंभीर जखमी झाला. घटनेनंतर वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेल्याचा प्राथमिक अंदाज असून, नागरिकांच्या सतर्कतेमुळे जखमी वन्यप्राण्याला वेळीच मदत मिळाली.
प्राप्त माहितीनुसार, खडकी टेकडी परिसरातून रोही रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाची त्याला धडक बसली. धडकेनंतर रोही रस्त्याच्या परिसरात जखमी अवस्थेत पडला होता. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच बोटोनी येथील वनपाल सुरेश मुंडाले वनविभागाच्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जखमी रोह्याला प्राथमिक उपचार केले. पुढील उपचाराबाबत वनविभागाकडून कार्यवाही करण्यात आली.
वन्यजीवांच्या जीविताचा प्रश्न ऐरणीवर!
मारेगाव–यवतमाळ राज्य महामार्गालगत वनक्षेत्र असल्याने या मार्गावर रोही, हरीण यांसह विविध वन्यप्राण्यांचा वावर असतो. विशेषतः खडकी टेकडी आणि बुरांडा परिसरात वन्यप्राणी अन्न-पाण्याच्या शोधात किंवा नैसर्गिक अधिवासातून रस्ता ओलांडताना दिसतात. मात्र, वाहनांचा वेग आणि चालकांची असावधगिरी वन्यप्राण्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता वाढवत आहे.
वन्यप्राण्यांना धडक देऊन पळ काढू नका!
वन्यप्राण्याला वाहनाची धडक बसल्यास वाहनचालकांनी घटनास्थळावरून निघून न जाता तातडीने वनविभागाला माहिती देणे आवश्यक आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या तरतुदींचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळावी, वनक्षेत्रातून जाताना विशेष खबरदारी घ्यावी आणि रस्त्यावर वन्यप्राणी दिसल्यास वाहनाचा वेग नियंत्रित करावा.
वन्यजीवांचे संरक्षण ही केवळ वनविभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे महामार्गावरील वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता संबंधित यंत्रणांनीही आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनांकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर