बातमी ऐका (Marathi Voice Reader)
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मैदानात मोठा ड्रामा पाहायला मिळाला. मॅचच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा 368 रनवर ऑलआऊट झाला. हेन्री निकोल्सने नाबाद 175 रनची खेळी केली, याशिवाय ग्लेन फिलिप्सने 118 रन केले. 70 रनवर 5 विकेट गमावलेल्या असताना निकोल्स आणि फिलिप्सने न्यूझीलंडला अडचणीतून बाहेर काढलं. भारताकडून जसप्रीत बुमराहला सर्वाधिक 4 विकेट मिळाल्या तर आकाश दीपला 3 विकेट घेण्यात यश आलं. अंशुल कंबोजला 2 आणि प्रसिद्ध कृष्णाला 1 विकेट मिळाली.
राहुल 5 रनवर असताना मैदानात ड्रामा
न्यूझीलंडचा 368 रनवर ऑलआऊट केल्यानंतर बॅटिंगला आलेल्या टीम इंडियाने सुरूवात सावध केली. दुसऱ्या दिवसाचा टी ब्रेक झाला तेव्हा भारताचा स्कोअर 16/0 एवढा झाला आहे. यशस्वी जयस्वाल 11 रनवर आणि केएल राहुल 5 रनवर खेळत आहे, पण टी ब्रेकच्या आधी केएल राहुलला जीवनदान मिळालं. मॅट हेन्रीने टाकलेला इन स्विंग केएल राहुलच्या पॅडला लागला, यानंतर हेन्री आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी जोरदार अपील केलं, पण अंपायरने राहुलला एलबीडब्ल्यू आऊट दिलं नाही.
अंपायरने नॉट आऊट दिल्यानंतर मॅट हेन्रीने न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लेथमकडे डीआरएस घेण्याची विनंती केली, पण टॉम लेथम आणि न्यूझीलंडच्या इतर खेळाडूंनी हेन्रीचं अजिबात ऐकलं नाही. डीआरएसचा टायमर संपल्यानंतर मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यात आला, त्यामध्ये केएल राहुल एलबीडब्ल्यू असल्याचं स्पष्ट दिसत होतं, पण न्यूझीलंडने डीआरएसच घेतला नसल्यामुळे राहुलला जीवनदान मिळालं. हा रिप्ले पाहून मॅट हेन्रीचा राग अनावर झाला, तसंच त्याने संतापाने मानही हलवली आणि स्वेटरही मैदानात फेकला.
न्यूझीलंडने का घेतला नाही डीआरएस?
आधीच्याच ओव्हरमध्ये न्यूझीलंडने एक डीआरएस गमावला होता, तसंच राहुलच्या पॅडला बॉल लागण्याआधी बॅटला लागल्याचं न्यूझीलंडच्या फिल्डरना वाटत होतं, कारण पॅडला बॉल लागताना दोन आवाज आले होते, त्यामुळे न्यूझीलंडने डीआरएस घेतला नाही, पण डीआरएस न घ्यायचा त्यांचा निर्णय चुकीचा ठरल्याचं रिप्लेमध्ये दिसलं.
KL RAHUL SAVED TWICE BY THE UMPIRE
– First, Kumar Dharmasena declared KL Rahul not out off Kyle Jamieson’s bowling. Tom Latham took a review, but the decision remained unchanged.
– Now, off Matt Henry’s bowling, Rahul was clearly out, but the umpire again declared him not out. NZ had already lost one review, so they couldn’t take another.
– However, DRS showed that it was clearly OUT!
POOR UMPIRING BY KUMAR DHARMASENA!
— Sam (@cricsam02) November 20, 2026
जयस्वालचा कॅचही सोडला
केएल राहुलला लाईफलाईन दिली असतानाच न्यूझीलंडच्या फिल्डरनी यशस्वी जयस्वालचा कॅचही सोडला. काईल जेमिसनच्या बॉलिंगवर जयस्वालने जोरात शॉट मारला पण त्याच्या बॅटच्या एजला बॉल लागला आणि गलीमध्ये ग्लेन फिलिप्सच्या दिशेने गेला, पण फिलिप्सने जयस्वालचा कॅच सोडला एवढंच नाही तर बॉल बाऊंड्री लाईनच्या बाहेरही गेला.