ब्रेकिंग न्यूज
⚡ मारेगाव–यवतमाळ महामार्गावर अज्ञात वाहनाची रोह्याला धडक! ✦ ⚡ घोडदरा शिवारात वाघाचे पगमार्क; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! ✦ ⚡ ‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव… ✦ ⚡ IND vs NZ : केएल राहुल 5 रनवर असताना मैदानात मोठा ड्रामा… हेन्रीला कॅप्टनने वेड्यात काढलं, पण पुढच्या 2 म… ✦ ⚡ MPSC गट-क परीक्षेसाठी जम्बो भरती, तुम्ही करताय तयारी? अनुभवी विद्यार्थ्यांनी दिले 5 सिक्रेट टिप्स! Video ✦ ⚡ CRIME : ‘आई कुणीतरी मला ब्लॅकमेल करतंय’, हरिश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून 20 वर्षाच्या तरुणाचा संशयास्पद मृत… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ Chandrapur News : चौकात मानवी कवटी, रुळाजवळ छिन्नविच्छिन्न मृतदेह; चंद्रपुरात खळबळ उडवणाऱ्या घटनेबाबत पोलि… ✦ ⚡ अनैतिक संबंधांचा वाद, पत्नीला झोपेतच संपवलं, मग 65 वर्षाच्या पतीचं टोकाचं पाऊल, बीड हादरलं!
SP News Maregaon

‘एचआयव्ही’ग्रस्त असल्यानं पत्नी सोडून गेली; पुण्यात चुलत्यानं अल्पवयीन पुतणीवरच केला अत्याचार, जामीन अर्जाव…

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुणे : एचआयव्ही बाधित असल्यानं पत्नी सोडून गेली. मात्र, यानंतर ५० वर्षीय व्यक्तीनं असं काही केलं, ज्यानं सगळ्यांनाच हादरवून सोडलं. या नराधमानं आपल्याच अल्पवयीन पुतणीवर अत्याचार केला. लोणी काळभोरच्या कदमलाक वस्ती परिसरात ही धक्कादायक घटना घडली. पन्नास टक्के मानसिक दिव्यांग असलेल्या अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या या नराधम काकाचा जामीन अर्ज आता पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला आहे.

या प्रकरणी कदमवाक वस्ती परिसरातील ५० वर्षीय आरोपीविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पीडितेच्या आईने तक्रार दिलेल्या तक्रारीनंतर आरोपीला सहा मार्च रोजी अटक करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Pune News: धक्कादायक! मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरच पतीचं भयानक रूप; आधी कार ट्रकला धडकवली, मग पत्नीवर शस्त्रानं सपासप वार, शेवटी…

या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याला अतिरिक्त सरकारी वकील एस. पी. पोंडकुळे यांनी विरोध केला. आरोपी आणि पीडित नातेवाईक आहेत. ते शेजारी-शेजारी राहतात. जामीन मंजूर केल्यास तो पीडितेचे कुटुंबीय आणि साक्षीदारांना धमकावू शकतो. तसेच पसार होऊ शकतो, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. हा युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपीला जामीन नाकारला आहे.

आरोपी एचआयव्ही बाधित असल्यानं त्याची पत्नी त्याच्यापासून वेगळी राहाते. मात्र, स्वतःला जीवघेणा आजार असल्याचं माहिती असताना आणि याबद्दलची पूर्ण कल्पना असतानाही आरोपीने मानसिकदृष्ट्या दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार केले आहेत, असं निरीक्षण नोंदवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश संतोष कुलकर्णी यांनी आरोपीला जामीन नाकारला.

ही बातमी शेअर करा
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर