ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

पतीच्या अनैतिक संबंधाचा संशय, महिलेला घरातून उचलले, अज्ञात स्थळी डांबले:मुंबईतील काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुंबईच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भांडुपमधील काँग्रेसच्या नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर एका महिलेचे अपहरण करून तिला अमानुष मारहाण केल्याप्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुप प्रभाग क्रमांक 110 च्या काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर या मुंबईतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कोपरकर यांच्या पत्नी आहेत. सुरेश कोपरकर यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय नगरसेविका आशा कोपरकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना होता. याच संशयातून कोपरकर कुटुंबीयांनी या महिलेला धडा शिकवण्याचा कट रचला. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी तिला तिच्या राहत्या घरातून बळजबरीने उचलले आणि गाडीत टाकून तिचे अपहरण केले. जीवे मारण्याची धमकी महिलेचे अपहरण केल्यानंतर कोपरकर कुटुंबीयांनी तिला एका अज्ञात ठिकाणी नेऊन डांबून ठेवले. तिथे नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई आणि मुलाने मिळून पीडित महिलेवर प्रश्नांचा भडीमार करत तिला अमानुषपणे मारहाण केली. एवढेच नव्हे तर, या घटनेबाबत तोंड उघडल्यास किंवा पोलिसांत गेल्यास ‘तुला जीवे मारू’, अशी गंभीर धमकीही या राजकीय कुटुंबाने पीडितेला दिली. या संपूर्ण गुन्ह्यात कोपरकर कुटुंबाच्या खाजगी चालकानेही त्यांना मदत केल्याचे समोर आले आहे. नगरसेविकेसह संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल या भयानक प्रसंगातून सुटका झाल्यानंतर पीडित महिलेने थेट भांडुप पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलत नगरसेविका आशा कोपरकर, त्यांच्या दोन मुली, जावई, मुलगा आणि खाजगी चालक अशा सर्वांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार अपहरण, बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा गुन्हा दाखल केला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर