ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

धर्मस्वातंत्र्य विधेयकात कोणत्याही धर्मावर अन्याय नाही:विरोधकांकडून मतांच्या लांगुलचालनासाठी राजकारण, CM फडणवीसांची भूमिका

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक हे कोणत्याही धर्मावर अन्याय करण्यासाठी नसून, धर्मांतरणाच्या नावाखाली चालणाऱ्या कुप्रथांना आळा घालण्यासाठी आहे,” असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या विधेयकावरून विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना त्यांनी हे विधेयक सामाजिक सुरक्षिततेसाठी आणि विशेषतः महिलांच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे ठामपणे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास कायद्यात त्यासाठी स्पष्ट प्रक्रिया दिलेली आहे. मात्र, कुणी आमिष दाखवून, भीती घालून किंवा चुकीच्या पद्धतीने धर्मांतर करत असेल, तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीला कायद्याने शिक्षा होणे गरजेचे आहे. केवळ धर्मांतरासाठी मुलींना फूस लावून पळवून नेणे, लग्न करणे आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडून देणे, अशा अनेक वेदनादायी घटना समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्या महिलांचे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य अंधकारमय होते. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठीच हा कायदा करण्यात आला आहे. विरोधकांकडून केवळ ‘व्होट बँक’चे राजकारण विधेयकाला विरोध करणाऱ्या विरोधकांवर हल्ला चढवताना फडणवीस म्हणाले की, “विरोधक केवळ मतांच्या लांगुलचालनासाठी या विधेयकाला विरोध करत आहेत. त्यांनी जर हे विधेयक पूर्णपणे वाचले, तर ते कधीच विरोध करणार नाहीत. महाराष्ट्र हे काही अशा प्रकारचा कायदा आणणारे पहिले राज्य नाही. यापूर्वी देशातील १० ते १२ राज्यांनी असा कायदा लागू केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसत आहेत.” हे ही वाचा… मताची पोळी शेकण्यासाठीच धर्म स्वातंत्र्य विधेयक आणले:काही विषारी मंत्री पोसले जाताहेत, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ सादर करण्यात आले असून, यावर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विधेयकावर पुढील तीन दिवस विधानसभेत चर्चा होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, “हे विधेयक केवळ दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करून मतांची पोळी शेकण्यासाठी आणले आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. सविस्तर वाचा…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर