ब्रेकिंग न्यूज
⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ ज्ञानेश्वर ढोके यांच्या ३२ वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता ✦ ⚡ 6,6,6,4,6,4,6,6… इकडं अभिषेकने ‘गोल्ड’ पटकावलं, तिकडं गुरू Yuvraj Singh चा राडा! ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 धा…
SP News Maregaon

टीसीएस धर्मांतर प्रकरण:निदा खानच्या पाठीशी ‘मायनॉरिटी कमिटी’ राहणार उभी; मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिकच्या टीसीएस कंपनीत कार्यरत असलेल्या एका अविवाहित तरुणीवरील अत्याचार आणि बळजबरीने केलेल्या धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय व सामाजिक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिच्या बाजूने आता ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ मैदानात उतरली आहे. अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी हा बनाव रचल्याचा दावा माजी आदार आसिफ शेख यांनी केला आहे. दुसरीकडे, आश्रय दिल्याचा आरोप असलेले छत्रपती संभाजीनगरमधील ‘एमआयएम’चे नगरसेवक मतीन पटेल आज नाशिक पोलिसांसमोर हजर झाले आहेत. इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार आसिफ शेख यांनी या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शेख यांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. “नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठीच हे धर्मांतराचे प्रकरण जाणीवपूर्वक पुढे आणले गेले आहे. टीसीएस प्रकरणातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून निदा खान यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत,” असा दावा शेख यांनी केला. या प्रकरणातील ७ आरोपींच्या न्यायालयीन लढाईसाठी ‘मायनॉरिटी डिफेन्स कमिटी’ पूर्ण ताकदीने कायदेशीर मदत करेल आणि सुनावणीदरम्यान आपण स्वतः न्यायालयात हजर राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना जाहीर केले. मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान फरार असताना तिला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक गुन्हे शाखेचे पथक यापूर्वी पटेल यांच्या शोधासाठी संभाजीनगरमध्ये दाखल झाले होते, मात्र ते तिथे सापडले नाही. आता या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती. नोटीस मिळताच मतीन पटेल यांनी नरमाईची भूमिका घेत आज नाशिक शहर पोलिसांसमोर हजेरी लावली असून, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. व्हॉट्सॲप चॅटमधून ‘हानिया’ नावाचा खुलासा दुसरीकडे, या संवेदनशील गुन्ह्याचा तपास करणाऱ्या नाशिक पोलिसांच्या हाती अत्यंत भक्कम तांत्रिक पुरावे लागले आहेत. मुख्य संशयित निदा खान हिने तिच्या एका जवळच्या नातेवाईकासोबत केलेल्या व्हॉट्सॲप चॅटिंगचा तपशील पोलिसांच्या हाती लागला आहे. या चॅटिंगमधून समोर आलेली धक्कादायक माहिती अशी की, संशयितांनी पीडित तरुणीला जाळ्यात ओढण्यासाठी एक विशिष्ट योजना (कट) आखली होती. या योजनेनुसार पीडित तरुणीचे वर्तन बदलू लागताच, तिचे मूळ नाव बदलून ‘हानिया’ असे नवीन नावही निश्चित करण्यात आले होते. या डिजिटल पुराव्यामुळे पोलिसांच्या तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर